इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
इंदापुर तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश व शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधत धनंजय मुंडे बोलत होते,मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे भाजपच्या विरोधात एकत्र लढत होते,त्यावेळी महाराष्ट्रातील एक पक्ष,एक नेते जे आज स्वतः ला राज समजतात त्यावेळी या महाशयांनी लोकसभेच्या वेळी भाजपच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या विरोधात बोलले..आणि बोलत बोलत ते म्हणायचे..”लाव रे सीडी” आणि त्याचं परवाचे भाषण ऐकल्यानंतर त्याच्यांत ED ची भलतीच मोठी मेख ठोकलेली दिसतेय..अशी खरमरीत टीका मुंडे यांनी राज ठाकरेंवर केली.
एकेकाळी ज्या साहेबांवरती बोलताना ह्यांच्या स्तुती सुमनांची भाषणे थांबता थांबच नव्हती. आणि आज तुम्ही आमच्या दैवतावर टीका केली ? का ? असा सवाल देखील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केला. त्यांच्या भाषणांवरून त्यांना पुन्हा ED ने आवळलेलं दिसतंय..आणि म्हणूनच परवाच्या सभेत त्याचं बोलायचं राहून गेलं..लावरे ती सीडी..आणि आज ते म्हणतायंत कुठंय ती सीडी…असं म्हणत मुंडे यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
महाराष्ट्रात अथवा देशात कुठेही काय झालं की आमच्या नेतृत्वावर टीका करायची असं देखील मुंडे यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांना संबोधित करताना मुंडे म्हणाले की,इथं उपस्थित असलेले आपण सर्वजण शेतकरी आहोत. आपली जात शेतकऱ्याची आहे.आणि हा शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांचा विचार येणाऱ्या पिढ्यान पिढ्या आपल्याला जिवंत ठेवावा लागेल.तरच शेतकऱ्यांची जात जिवंत राहील.असे देखील मुंडे यांनी आवर्जून सांगितले.