पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! आता पोलीस शिपाई बनणार थेट हवालदार तर सहा.पोलीस उपनिरीक्षक होणार थेट फौजदार..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पोलीस दलात ३० वर्षे सेवा बजावलेल्या आणि सहा. पोलीस उपनिरीक्षक पदावर ३ वर्षे काम केलेल्याना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून,यामुळे मुंबईसह राज्यभरातील हजारो सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे आता फौजदार होणार आहेत.

या योजनेनुसार साखळी पदोन्नती मिळण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हा निर्णय २ महिन्यांपूर्वीच घेतला होता.त्यात शिपाई पदानंतरचे नाईक पद रद्द करून शिपायांना थेट हवालदार पदाची संधी देण्यात आली होती.तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना उपनिरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती.त्यामुळे सध्या या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना उपनिरीक्षक पदाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने आदेश काढले असून,अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्यासाठी ही उपनिरीक्षक पदाची पदोन्नती सुरू केली आहे.दरम्यान,या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण,या पदावरील ३ वर्षे काम पूर्ण तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभानुसार पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या पदाची वेतन श्रेणी घेत असलेले असे ३ निकष पूर्ण करणाऱ्याना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना उप निरीक्षक पदाची पदोन्नती देण्यात येत असल्याच्या सूचना राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी काढल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *