Political News : इंदापुर तालुक्यातील २२ दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर ? आतापर्यंत केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास पवार, पाटील आणि राज्यमंत्री भरणे देखील अपयशी ??


इंदापूर मधील २२ गावांचा पाणी प्रश्न कधी मार्गी लागणार इंदापूरकरांचा राज्यमंत्री भरणेंना सवाल...

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील दुष्काळी २२ गावांच्या सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गेल्या ४० ते ४५ वर्षापासून प्रलंबित असून,कित्येकदा निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन पाटलांसह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील केवळ आश्वासने दिल्याची चर्चा देखील इंदापुरात जोरदार रंगली असून केवळ इंदापुरकरांच्या तोंडाला पान पुसल्याचा प्रकार झाल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी घेऊन इंदापूर तालुक्यातील खडकवासला उजव्या कालव्यावरील ३६ गावे व नीरा डावा कालवा वरील २२ गावांना शेती सिंचनासाठी पाणी देण्याची योजना सरकारने आखली होती. त्यानुसार योजनेच्या सर्वेक्षणास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम मंजुरी दिली होती.या निर्णयामुळे मात्र,सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण पेटले होते. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे नाईलाजास्तव जलसंपदा विभागाला उजनीतून पीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय स्थगित करण्याची वेळ आली होती. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी या योजनेचे शासन पत्र रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते.

विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये याच 22 गावांतील पाण्याच्या प्रश्नावर राजकारण केले जाते सत्ताधारी आणि विरोधक सभामधून आरोप-प्रत्यारोप करत शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. मात्र अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला उजनीचा पाणी प्रश्न अद्याप पवार, पाटील तसेच भरणे यांना सोडवता आला नाही.. यात राजकारणातील चाणक्य असलेले शरद पवार यांना देखील हा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवता आला नाही.. आज इंदापुर तालुक्यातील लाखेवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश व शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधत,शरद पवार बोलत होते ,श्रीमंत ढोलेनी आपल्या भाषणात २२ दुष्काळी गावांच्या पाण्याचा प्रश्न मांडला ही गोष्ट खरी आहे.या बाबतीत दुर्दैवाने सोलापुरच्या सहकाऱ्यांचा गैरसमज झाला,त्याच्यामध्ये जाऊन ते थांबले आता अजित दादा आणि बाकी सहकाऱ्यांच्या सहकार्याने मुळशी धरणातील इथे पाणी आणता येईल का ? या दृष्टीने पाहणी सुरु केली आहे.आणि तो आग्रह केवळ दत्ता मामांचा आहे.

यावेळी पवार म्हणाले की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या आग्रहातून प्रश्न सुटायच्या दृष्टीने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढता आला तर लवकरात लवकर काही झालं तर त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल.आणि लवकरच पाणी प्रश्नावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन पवारांनी इंदापुर मधील शेतकऱ्यांना दिले.मात्र राज्यमंत्री भरणे यांनी आज राष्ट्रवादीला एवढं मोठं बक्षीस दिल असताना,आज इंदापुरकरांना शरद पवारांकडून मोठी अपेक्षा होती,मात्र इंदापूरकरांचा पवारांकडून आश्वासना शिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही यामुळे आता पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *