दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड हद्दीत मेरगळवाडी येथे पोलिसांना एक बेवारस मृतदेह मिळून आला होता.राजेंद्र गणपत शिंदे वय.३४ वर्षे ( रा.लक्ष्मीनगर, गवळीवाडा,दौंड )असे या बेवारस झालेल्या मयताचे नाव आहे.मयता बरोबर घातपात झाल्याचा संशय आला पोलिसांना आला होता. याप्रकरणी पोलिसांनी उमेश गुरबळ आप्पा बनजगोल, वय.५२ वर्षे ( रा.गजानन सोसायटी,दौंड ) याला या खूनप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुरकुंभ मार्गावरील मेरगळवाडी येथे २५ मार्च रोजी एक बेवारस मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला, त्यावेळी मयताच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने या व्यक्तीचा कोणीतरी खून करून या ठिकाणी आणून टाकले असावे असा संशय पोलिसांना होता.दौंड पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यात एखाद्या बेपत्ता व्यक्तीची नोंद आहे का ? याची माहिती घेतली असता,माहिती मिळत नसल्याने तीन दिवसानंतर पोलिसांनी मयताचा बेवारस म्हणून अंत्यविधी केला.३१ मार्चला ज्ञानेश्वर शिंदे,सत्यभामा शिंदे यांनी त्यांच्या घरातील व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती दौंड पोलिसांना दिली.
पोलिसांच्या ताब्यातील मयत व्यक्तीचे वर्णन व अंगावरील खुणा,या शिंदे यांच्या बेपत्ता झालेल्या व्यक्तीशी तंतोतंत जुळत असल्याने मयत व्यक्ती हीच राजेंद्र शिंदे असल्याचे निष्पन्न झाले.आरोपीने २३ मार्च रोजी राजेंद्र यास आपल्या दुचाकीवर बसून मेरगळवाडी परिसरात नेऊन त्याला दारू पाजत त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करत खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी आणि मयताची पत्नी यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय या खून प्रकरणांमध्ये येत असून यामध्ये मयत राजेंद्र याचा अडसर येत असल्याने आरोपीने आपल्या मार्गातील अडसर दूर करण्याच्या हेतून खून केला असावा असा संशय दौंड पोलिसांना असून,या खून प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास दौंड पोलीस करीत आहेत. आरोपीला कोर्टात हजर केले असता,त्याला ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंड पोलिस उपअधीक्षक राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार डी.जी.भाकरे पोलीस कर्मचारी पांडुरंग थोरात, सुभाष राऊत,अमोल गवळी, अमीर शेख,विशाल जावळे, निखिल जाधव, अमोल देवकाते,सचिन बोराडे,आदेश राऊत यांनी केलेली आहे.