Breaking News : भाजपच्या या आमदारांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

औरंगाबाद मधील महावितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ करणे बबनराव लोणीकरांना चांगलच महागात पडले आहे.याबाबतची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे.लोणीकरांवर जालना पोलिसांत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकरांविरोधात जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये लोणीकरांकडून अनुसूचित जातीच्या लोकांचा अवमान झाल्याचा आरोप दिनकर घेवंदे यांनी केला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *