Big Breaking : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील वानखेडेंना गोत्यात आणणाऱ्या प्रभाकर साईलचा मृत्यू..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार प्रभाकर साईल याचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे.गतवर्षी कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर तत्कालिन तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप करुन साईल चर्चेत आला होता. दरम्यान आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईल याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आर्यनला अटक केल्यानंतर या प्रकरणातील प्रथम पंच किरण गोसावी चर्चेत आला होता. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. त्याच्याकडेच प्रभाकरची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होती.मात्र छाप्यानंतर साईल याने वानखेडे आणि गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. क्रूझवर छापा घालण्यापूर्वी किरण गोसावी आणि समीर वानखेडेंच्या मोबाईलवरून संभाषण झाले होते.याशिवाय त्यांच्यात डील झाल्याचेही त्याने म्हटले होते.आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती,असा दावाही साईलने केला होता.

वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो,असा दावा प्रभाकर साईल याने केला होता. क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *