इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक नुकतीच पार पडली.यामध्ये ४८४ प्रस्ताव कार्यालयात प्राप्त झाले होते यापैकी ४७४ प्रकरण मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली.यावेळी बोलताना सागर मिसाळ म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेची बैठक इंदापूर तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना,संजय गांधी निराधार अनुदान योजना,अपंग योजना असे एकूण ४८४ प्रस्ताव
कार्यालयात प्राप्त झाले होते.सर्व सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या छाननीमध्ये कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने दहा प्रकरणे नामंजूर करण्यात आले आहेत. ४७४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
यावेळी सदस्य सचिव तहसीलदार श्रीकांत पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ,सदस्य हनुमंत कांबळे, महादेव लोंढे,नितीन शिंदे,दत्तात्रय बाबर, प्रमोद भरणे,नायब तहसीलदार वायकर मॅडम,सहाय्यक प्रशासन अधिकारी शरद जगताप आदी उपस्थित होते.