बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
जिल्हा परिषद पुणे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केलेले होते त्यामध्ये म्हसोबावाडी शाळेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी आकांक्षा चांदगुडे हिने निबंधलेखन स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला व इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेमध्ये इंग्लिश निबंधलेखन स्पर्धेत ७ वी मधील अनुष्का जाधव या विद्यार्थिनीचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे.
त्यानिमित्ताने आज इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते पंचायत समिती इंदापूर येथे विध्यार्थी व वर्गशिक्षक यांचा सत्कार समारंभ पार पडला.या दोन्ही विध्यार्थीनींना मार्गदर्शन वर्गशिक्षक ज्ञानेश्वर वणवे सर यांनी केले.तसेच विद्यार्थ्यीनींनी मिळविलेल्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक ,पालक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या यशामुळे म्हसोबावाडी शाळेचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पालकवर्ग,शाळा व्यवस्थापन समिती,तसेच अधिकारी,पदाधिकारी वर्ग यांचेकडून कौतुक होत आहे.