Political Breaking : राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना चौथा धक्का… राष्ट्रवादीचे दीपक जाधव स्वगृही परतणार..!!


इंदापुर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सध्या इंदापुराच्या राजकारणाने एक वेगळे वळणं घेतले असून, यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटलांना एकामागून एक धक्के देत आहेत.यामध्ये बावडा- लाखेवाडी या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,माजी सभापती स्वाती शेंडे,खांदे समर्थक बापूराव शेंडे यांच्यानंतर आता भाजपची आक्रमक तोफ डागणारे आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक दिपक जाधव हे देखील आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गळाला लागले असून,हा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना फार मोठा झटका मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चा पक्ष प्रवेश सोहळ्यास आणखी दोन दिवस अवधी असल्याने आणखी काही चेहरे भरणे आपल्या गळाला लावण्याची शक्यता आता वाढली आहे.गेले अनेक दिवस भाजपवासी असणारे युवानेते दिपक जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर होते.जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार, अशी चर्चा गेले अनेक दिवसांपासून होती. त्यांच्या प्रवेशामुळे त्याला आज पूर्णविराम मिळाला. जाधव यांनी २००६-०७ मध्ये इंदापूरच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करत दोन वर्षे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत पक्ष संघटन वाढविले होते.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते २०१० मध्ये तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. काँग्रेसमध्ये ते हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक बनले होते.गलांडवाडी नं.१ ग्रामपंचायतीवर त्यांची २००९ पासून एकहाती सत्ता आहे. पळसदेव-बिजवडी गटातून सोनाई परीवाराचे संचालक प्रवीण माने यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा अवघ्या काही मताधिक्याने पराभव झाला होता. त्यामुळे स्वगृही परतल्यानंतर त्यांच्यावर काय जबाबदारी येणार, हे ३ एप्रिलनंतर समजणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *