Big Breaking : कर्जाची नोटीस बजावल्याचा राग मनात धरत सुप्यात बॅंक अधिकाऱ्याला मारहाण; वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकीतबाकीच्या कर्जाची नोटीस बजावल्याच्या कारणावरून सुप्याच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बॅंकेतच मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी अभिनय उर्फ काका कुतवळ ( रा.सुपा,ता.बारामती,जि.पुणे ) याच्यावर भा.द.वि कलम ३२६, ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय पाडूंरंग कदम (रा. माळेगाव बुद्रूक,ता.बारामती,जि. पुणे ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संशयित आरोपींचे कुतवळ यांचे नातलग सागर कुतवळ यांना सोनेतारण थकीत कर्ज प्रकरणी २९ रोजी नोटीस बजावण्यासाठी मोरगाव येथे गेले असता, तेथून ते परत येत असताना त्यांना कुतवळ यांनी फोन करत काहीही कारण नसताना शिविगाळ केली.तुम्ही शिविगाळ का करता अशी विचारणा फिर्यादीने केली असताना त्यांनी तु बॅंकेत ये, तुझ्याकडे बघतो असे म्हणत फोन ठेवून दिला.दुपारच्या सुमारास फिर्यादी बॅंकेत आले असता,कर्ज विभागात काम करून अकाऊंट विभागात ते जात असताना सव्वा वाजण्याच्या सुमारास कुतवळ हे तेथे आले.

त्यांनी काही एक न विचारता शिविगाळ केली.हाताने मारहाण करत हाताची बोटे पिरगाळत खुर्चीवर ढकलून दिले.फिर्यादी खाली पडल्यानंतर खुर्चीने मारहाण सुरु केली. त्यात फिर्यादीच्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली. बॅंकेतील कर्मचारी हनुमंत किसन भगत, सुरेश रामचंद्र गायकवाड यांनी भांडण सोडवले.त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांना कल्पना दिली.असे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे अधिक तपास करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *