पशु विभागाकडून तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई मिळावी.. शेतकऱ्यांची मागणी….
बारामती : सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे तापमानामध्ये ३९ ते ४० अंश डिग्री सेल्सिअस तापमान झालेले आहे याचा फटका माणसांबरोबर मुक्या जनावरांना देखील बसत आहे. हवामान खात्याकडून अजून दोन दिवस उष्णतेची तीव्रता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेळ्या अचानक दगावल्या आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने अचानक झारगडवाडी येथील गोपीनाथ बोरकर, मंजाबापू बोरकर, कांतीलाल बोरकर यांच्या शेळ्यां तडपडून दगावल्या आहेत. शेळ्यां उष्माघाताने दगवल्याची शक्यता असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे यात या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दगावलेल्या शेळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करणार आहे. नेमकं शेळ्यांना अन्नातून विष बाधा झाली की अन्य काही होऊन शेळ्या दगावल्या आहेत हे शवविच्छेदन करून सॅम्पल औंध येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठवला जाईल आणि आलेल्या अहवालानंतरच नेमक्या शेळ्याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजणार असल्याचे सोनगांव विभागाचे पशुधन अधिकारी आर जी बुरुंगले यांनी सांगितलेय..