इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापुर शहरातील कसाई मोहल्ल्यात मोठ्या प्रमाणात गायी व बैल कापत असल्याची माहिती मिळाली असता, या ठिकाणी जात तब्बल २०० किलो गोमांस आणि गोमांस वाहतुक करण्यासाठी वापरण्यात जाणारी पिकअप क्र.MH.42.M.6409 असा एक लाख सत्तर हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अब्दुल लतीफ शेख (रा.कुरेशी गल्ली,ता. इंदापूर),अस्लम कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही ) (रा. कुरेशी गल्ली,ता. बारामती),इरशाद शेख (पूर्ण नाव माहीत नाही (रा.कुरेशी गल्ली, ता.इंदापूर ) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि १८६० चे कलम ४२९,(३४), महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ),५ (क),९(अ),९(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस कर्मचारी महेश दत्तात्रय गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इंदापुरातील कुरेशी गल्लीत अब्दुल शेख आणि अस्लम कुरेशी यांच्या राहत्या घराशेजारी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गायी व बैल कापत मांस विक्री करत असल्याची माहिती मिळाली असता,त्या ठिकाणी जात छापा टाकत पाहणी केली असता,त्याठिकाणी मांस मिळून आले.या ठिकाणचं मासांच सॅम्पल घेण्यासाठी तालुका पशु वैद्यकीय अधिकारी तांबे यांना संपर्क केला.त्याठिकाणी पोलिसांची चाहूल लागताच तेथून दोघांनी पळ काढला.यावेळी त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा पिकअप क्र.MH.42.M.6409 गाडी आणि ३ गाई व ३ वासरे यांचे तब्बल २०० किलो मांस मिळून आले.या गाडीच्या चालकावर आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.इंदापूर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.