Political Breaking : महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ…सरकारच्या आणखी दोन मंत्र्यांवर गुन्हा दाखल..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाविकास आघाडी सरकार मधील आणखी २ मंत्री अडचणीत आले आहेत.अनिल देशमुख,नवाब मलिक यांच्यानंतर आता एका जाहिर कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नेत्यांनी एका कार्यक्रमात तलवार पकडल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.या प्रकरणावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी मंत्री अस्लम शेख,वर्षा गायकवाड यांचे फोटो ट्विट करत काही खोचक सवाल केले होते.काही दिवासांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर जल्लोष केला होता.

हा जल्लोष करताना भाजप नेते मोहीत कंबोज यांनीही कार्यकर्त्य्यांसह जल्लोष साजरा केला.त्यावेळी त्यांनी तलवार दाखवली होती.त्यानंतर मुंबई पोलिसांनी मोहीत कंबोज यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *