पुणे ग्रामीण विशेष पथकाची कारवाई..
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….
दौंड शहरामध्ये नेने चाळ येथील एका दुकानात काही इसम आपल्या हस्तकांकरवी कल्याण व तारा मटका नावाचा जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता,त्याठिकाणी साध्या वेशात जात टेहळणी करून माहिती काढत छापा टाकला असता यावेळी संशयित आरोपी रमेश शामराव जाधव, वय.५० वर्षे ( रा.दौंड,गोवा गल्ली ता.दौंड जि.पुणे ) अजय नागनाथ जाधव,वय. ४९ वर्षे ( रा.दौंड, आंबेडकर चौक ता.दौंड जि.पुणे ) मौलाबक्ष शेख,वय.५२ वर्षे ( रा.दौंड,खाटीक गल्ली ता.दौंड जि.पुणे ) सौदागर सिदाराम नरगमकर,वय.६० वर्षे ( रा.दौंड, शालिमार चौक,ता.दौंड,जि.पुणे ) यांना जुगार खेळवित व खेळत असताना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातील २६ हजारांचे मटका जुगार स्लीप व इतर साहित्य असा पन्नास हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दौंड शहरातील नेने चाळ येथील एका दुकानात राजेश उर्फ बंटी जाधव व रमेश जाधव हे दोघे आपल्या हस्तकांमार्फत कल्याण नावाचा जुगार मटका चालवत असल्याची माहिती प्रोबेशनरी आय.पी.एस तेगबिरसिंग संधू व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यानं मिळाली असता, त्याप्रमाणे दि.२६ मार्च २०२० रोजी साध्या गणवेशात जात मटका अड्डाच्या ठिकाणी पाहणी करून छापा टाकला असता,रमेश जाधव,अजय जाधव मौलाबक्ष शेख,सौदागर नरगमकर यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील तब्बल ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, मटका अड्डा चालविण्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ? याबाबत तपास सुरू आहे.
हा संशयित आरोपी राजेश उर्फ बंटी जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षाला आणि माजी शहराध्यक्षाला ताब्यात घेतले असून राजेश जाधव याच्यावर गर्दी,मारामारी १ जुगार ५ आणि सावकारी कायदा १ असे एकूण सात गुन्हे दाखल असून,संशयित आरोपी रमेश जाधव याच्यावर यापूर्वी जुगार कायद्यांव्ये एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामती विभाग अप्पर पोलीस,अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी आय.पी.एस.तेगबिरसिंग संधू सहा.पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांनी केलेली आहे.