Big Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली ; मी जर तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार…?? पहा नक्की काय म्हणाले अजित पवार..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते.या कार्यक्रमात अजित पवार यांनी दत्तात्रय भरणेंना आपल्या पदाची आठवण करुन दिली.मात्र आठवण करून देताना, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. फटकेबाजी करताना मात्र अजित पवारांची पुन्हा एकदा जीभ घसरली.

दत्ता भरणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहेत.त्यांनी जिल्ह्यासाठी चांगला निधी आणलाय आहे. त्यांना आम्ही विनंती करत असतो की आमच्या तालुक्याला पण निधी द्या.तुम्ही फक्त इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री नाही आहात.बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत, परंतु त्यांना कुठं माहिती आहे की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी उघडली नाही तर त्यांना काय मिळणार… घंटा ..??

असं म्हणत अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. यामुळे उपस्थितांमध्ये हस्यकल्लोळ उडाला.तसंच, पवार यांना आपल्या विधानामुळे वाद होऊ शकतो हे लक्षात आल्यावर आता गाडी घसरायला लागली आहे आता थांबतो अस म्हणत सावरून घेतलं.आणि आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *