Indapur Crime News : दारू पिऊन आल्याने ऊस तोडणी करत नसल्याच्या कारणावरून केली मारहाण ; मारहाणीत ऊसतोड मजुरांचा मृत्यू..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

ऊसतोडणी करण्यासाठी आलेला मजूर दारू पितो आणि ऊस तोडणी करत नाही या कारणावरून चिडलेल्या ऊस वाहतूकदाराने ऊसतोड मजुरास उसाने मारहाण केली.या महाराणीत अस्वस्थ झालेल्या ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. गणेश मधुकर लोखंडे,वय.३० वर्षे ( रा.बरकतपूर,ता.कन्नड,जि. औरंगाबाद ) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचे नाव आहे. याप्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची पत्नी अलका गणेश लोखंडे यांनी फिर्याद दिली असून,ऊस वाहतूकदार संशयित आरोपी अमोल हनुमंत माने ( रा.कात्रज,ता. करमाळा,जि. सोलापूर ) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गणेश लोखंडे व त्याची पत्नी अलका लोखंडे हे दोघे पती-पत्नी कात्रज येथील अमोल हनुमंत माने यांच्याकडे ऊस तोडणीचे काम करत असून,संशयित आरोपी अमोल माने यांचा ट्रॅक्टर ऊस तोडणी व वाहतुकीसाठी साखर
कारखान्याकडे असून त्याच्यावर ऊसतोड मजूर म्हणून गणेश व अलका हे दोघे काम करत होते.ऊस तोडणीचे काम भरणेवाडीत सुरू होते.त्यावेळी लोखंडे हा दारू पिऊन आला आणि त्याने ऊस तोडणी का केली नाही ? या कारणावरून चिडून जाऊन आरोपी अमोल माने याने गणेश यास उसाने पोटात व पाठीवर बेदम मारहाण केली.मारहाण झाल्याने गणेश गंभीर जखमी झाला व त्याला त्रास होऊ लागला.

त्यानंतर गणेश याची पत्नी अलका हिने गणेश याला उसाच्या कोपीवर नेले.रात्री गणेशचा त्रास वाढत गेल्याने कोणीच जेवण न करता झोपी गेले.पहाटेच्या सुमारास ऊस तोडणीसाठी गणेश हा उठत नसल्याने व गणेशाला जास्तच त्रास होऊ लागला, म्हणून हा त्रास कमी व्हावा म्हणून अलका हिने त्याला चहा करून दिला. मात्र गणेश हा चहा न पिताच झोपी गेला. सकाळी दिवस उजाडल्यानंतर अलका हिने पाहिले असता कोणतीच हालचाल होत नसल्याने तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकली.

त्यामुळे अलका हिने ऊस वाहतूकदार अमोल माने यास व गणेश याचे मामा वाल्मीक गायकवाड यांना बोलावून घेतले. त्या दोघांनी गणेश यास लासुर्णे येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी गणेश याची तपासणी केली असता, गणेशचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.ऊसतोड मजूर हा भिल्ल जमातीतील असल्याने या वाहतूकदारांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातूरे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *