एकीकडे दौंड तालुक्यात सुरू असलेली वाळू तस्करांवरील कारवाई… तर दुसरीकडे बारामती मधील दिवसा ढवळ्या सुरू असलेली वाळू तस्करी…
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदी पात्रात दिवसा ढवळ्या वाळू तस्करांनी धुडगूस घातला असून, या घालणाऱ्या वाळू माफियांवर आता महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून,मागील काही वर्षापासून हे वाळू तस्कर संघटितपणे महसूलच्या काळ्या सोन्याची तस्करी करत असून त्याच्यावर डल्ला मारत होते,परंतु आता महसूल व पोलीस प्रशासनाने लेट का होईना ? पण थेट कारवाई केली.या कारवाईत तब्बल १ कोटी ४० लाखांच्या २० यांत्रिक बोटी उध्वस्त केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून,या केलेल्या कारवाईमुळे दौंड मधील शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांनी अवैध वाळू उपश्याचा प्रश्न उपस्थित केल्यानेच महसूल व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असल्याची नागरिकांत जोरदार चर्चा सुरू आहे.आणि त्याच पार्श्वभूमीवर का होईना दि.२५ रोजी सकाळपासूनच दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रात यांत्रिक बोटीने अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात कारवाई केली आहे.वाळू तस्करांच्या अड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ४० लाखांच्या यांत्रिक बोटी उध्वस्त करण्यात आल्या आहेत.या कारवाईत एकही वाळूतस्कर महसूल व पोलिस प्रशासनाच्या हाती लागलेला नाही.ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने केलेली आहे.या कारवाईत तहसीलदार संजय पाटील,दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांच्या पथकाने कारवाई केली.
यामध्ये दौंड तालुक्यात महसूल आणि पोलीस प्रशासन वाळू तस्करांवर कारवाई करतात,मग याच धर्तीवर बारामतीच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यासाठी लखवा भरलाय काय ? की वेळच्या वेळी मिळणाऱ्या कार्डामुळे यंत्रणा खाल्लेल्या मिठाला जागणारी तर नाही ना ? असा प्रश्न आता बारामती करांकडून उपस्थित केला जात आहे.तहसीलदार विजय पाटील तर तालुक्यात वाळू तस्करी सुरुच नाही अशाच आविर्भावात आहेत की काय ? अशी चर्चा देखील जोर धरू लागली आहे.त्यामुळे आता तरी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील जनाच्या नाही तर मनाच्या लाजेने कारवाई करणार का ? अशा प्रश्न तालुक्यातील जनतेंकडून उपस्थित केला जात आहे.येत्या काळात मात्र महसूल आणि पोलीस प्रशासनातील वाळूचे कार्ड घेणारे वाझे लवकरच बारामतीकरांसमोर हे देखील तेवढंच सत्य आहे.
क्रमशः : लवकरच झारगडवाडी मधून चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या वाळू तस्करांचा करणार पर्दाफाश…