मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात ईडी आणि आयकर विभागाची कारवाई होत असून,मागील चार ते पाच दिवसांपूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई झाली होती.आणि आता याच प्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती.आणि १० मार्चला चहल यांना आयकर विभागानं उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती.
आयकर विभगाानं चहल यांना ३ मार्च रोजी नोटीस पाठवली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती.इकबाल चहल यांनी काय उत्तर दिलंय हे पाहावं लागणार आहे. तब्बल ३०० कोटींच्या टेंडरसंदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केले होते.मुंबईमध्ये आयकर विभाग सक्रिय झाल्याचं देखील यानिमित्तानं समोर आलं आहे. सध्या समोर आलेली नोटीस जुनी आहे.