पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुण्याचे विमानतळ कुठेही हलवणार नाही. ते कोणाला सुप्याला बंधायचंय,कोणाला बारामती बांधायचं आहे त्यांनी बांधावं,असा टोला खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लगावला आहे. विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष बापट यांनी पुण्यातील विमानतळ स्थलांतर करणार नाही अशी घोषणा आज केली आहे. पुणेकरांना सोयीचे असल्याने विमानतळ तिथेच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केलं आहेत.
लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबत खासदार गिरीश बापट आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे.पुढे ते म्हणाले,पुण्यातील विमानतळाचे स्थलांतर होणार नाही. नागरिकांना आवश्यत असणाऱ्या सुविधा वाढवल्या जातील.याआधी कार्गो लहान होता आता तोही मोठा करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात एका तासात २३०० लोकं ये जा करतील, असे व्यवस्थापन केले जाईल.१४ विमान इथे पार्क करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले आहे.
शरद पवारांनी जो प्रस्ताव आणला त्याला विरोध नसून त्याचं स्वागतच आहे.पश्चिम महाराष्ट्राला त्याचा उपयोगही होईल पण लोहगाव विमानतळ विस्तारीकरण होईल हे पक्क आहे. याठिकाणी दळणवळणच्या सुविधा सुरळीत व्हाव्या या हेतूने हा प्रयत्न केला आहे.लष्करी विमानतळ असल्यानं सिव्हील विमानतळ राहणार आहे.यासाठी एक शिष्टमंडळ ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.