Big Breaking : मन्या सुर्वेचा एन्काऊंटर करणारे ACP इसाक बागवान यांच्याकडे बारामती व मुंबईत शेकडो कोटींची मालमत्ता…देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रोज एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत आहेत.आजच त्यांनी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त ACP इसाक बागवान यांच्यावर नेम साधला आहे.इसाक बागवान यांनी नोकरीत कार्यरत असताना,भाऊ नसीर इब्राहिम बागवान,चुलत भावजय बिल्कीस गुलाम हुसेन बागवान आणि वडील इब्राहिम बागवान यांच्या नावावर बारामती मधील मोतीबाग,अशोकनगर,मळद,भिगवण रोड या ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली होती. त्यानंतर त्यांचे भाऊ भावजय यांनी मात्र एक रुपयांचा तिकीट अर्ज दाखल करून सर्व मालमत्ता इसाक बागवान त्यांचा मुलगा सोहेल व पत्नी अंजुम इसाक बागवान यांच्या नावावर केली.

त्यानंतर इसाक बागवान व त्यांच्या कुटूंबियांनी यातील काही मालमत्ता मुंबईतील प्रतापचंद दत्तप्रसाद कपूर यांना विकली,व मात्र दोन महिन्यांत पुन्हा तीच मालमत्ता पुन्हा विकत घेतली. याशिवाय याच मालमत्तेतील काही भाग फरीद महंमद अली वेल्डर यांना तब्बल ४१ लाखांना विकली.आणि तीच मालमत्ता वेल्डर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी इसाक बागवान यांना मोफत बक्षीसपत्र करून दिली.

दरम्यान फरीद महंमद अली वेल्डर हा इसम दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या संपर्कात होता.इक्बाल कासकर याने वेल्डर यास दहा लाख दिल्याचे एक गुन्ह्यात समोर आले होते. त्यामुळे दाऊदशी कनेक्शन असलेल्या फरीद वेल्डर याने बारामतीत संपत्ती कशी काय घेतली ? व ती संपत्ती इसाक बागवान यांना का बक्षीसपत्र करून दिली ? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला.

दरम्यान या मालमत्तेवरून इसाक बागवान यांचे कौटुंबिक वाद झाल्यानंतर त्यांचा भाऊ नसीर बागवान हे प्रकरण पुढे आणणार होता,त्यावेळेस मुंबईतील एका बड्या नेत्याने बारामतीत येऊन मध्यस्थी करून सेटलमेंट केल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे बारामतीत राहणारे सेवानिवृत्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी इसाक बागवान हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.बेकायदा मालमत्तेच हे प्रकरण शेकडो कोटींचे आहे,तसेच या प्रकरणाला अंडरवर्ल्ड कनेक्शन दिसून येत असल्याने ईडी, एनआयए या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात लक्ष घालतील अशी शक्यता कायद्याच्या अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *