Breaking News : आणि त्याने चक्क या कारणासाठी घोड्यावरून वाटली जिलेबी आणि पेढे..!!


मस्साजोग गावांमध्ये प्रथमच मोरे कुटुंबाचा आगळा वेगळा अनोखा उपक्रम..

महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुर्वीच्या काळात राजा महाराजा यांच्या राजवाड्यात किंवा राजमहालात व पोलीस पाटील यांच्या घरात एखादं नवीन जर चांगलं काही घडलं की जाती भेद न करता संपूर्ण गावातील आठरा पगड जातीतील लोकांना एकत्र बोलवुन त्यांना छोटी मोठी भेट वस्तू व गोड जेवण देऊन राजा महाराजे आपला आनंद मोठ्या उत्सवात साजरा करत होते.तीच जुनी रित जोपासुन मस्साजोग येथील मोरे कुटुंबातील एका पट्याने आपल्या भावाला मुलगी झाली म्हणून चक्क संपूर्ण गावात हलगीच्या तालावर नाचुन व हलगी वाजवत चक्क संपूर्ण गावात जिलेबी वाटप करत असता त्याला गावातील लोकांनी विचारले अहो मोरे आज एवढे आनंदात येऊन वाजत गाजत घोड्यावर बसून जिलेबीचे वाटप कसं काय,काय विचारता ?

तर मोरे आनंदमयी होऊन मोठ्या आवाजात ओरडून हसत हसत म्हणाले,अहो मुलगी झाली. आमच्या भावांची व मोरे कुटुंबाची इच्छा पूर्ण झाली,म्हणून संपूर्ण गावातील लोकांना वाटण्यासाठी पन्नास किलो जिलेबी विकत आणली.केज तालुक्यातील मस्साजोग येथील मोरे कुटुंबातील प्रितम बुवासाहेब मोरे या पट्याने आपला भाऊ अमर बुवासाहेब मोरे याला कन्यारत्न प्राप्त झाले. म्हणून चक्क पन्नास किलो जिलेबी विकत आणून संपूर्ण गावातील लोकांच्या दारोदारी हलगी वाजवत व चक्क घोड्यावर बसून जाऊन चक्क पन्नास किलो जिलेबी वाटप करून आनंद उत्सव साजरा करून गावांमध्ये पुर्व कालीन एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गावातील व मस्साजोग परिसरातील नागरिकांनकडून व मोरे यांच्या नातेवाईकांन कडून प्रितम व मोरे कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *