BIG BREAKING : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी ४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून मलिकांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे.कोठडी वाढल्याने नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.नवाब मलिक यांच्या विनंतीवरून त्यांना काही वस्तू वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक अटकेत आहे.नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती.७ मार्चला त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता मलिक यांनी कोर्टाकडे बेड,खुर्चीची मागणी केली होती.नवाब मलिक यांनी १९९३ स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती.कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या ३० लाखांत खरेदी केली होती.असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका प्रकरणाचा तपास सुरु असताना मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आली होती.यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजल्याचे पाहायला मिळाले.सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून भाजप कडून नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून अधिवेशनात देखील मलिक यांचा मुद्दा गाजला आहे अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला असून या आठवड्यात देखील नवाब मलिक यांचा मुद्दा गाजणार असून विरोधक मलिक यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे तर सत्ताधारी पक्ष विकास आघाडी राजीनामा घेणार नसल्याचे वारंवार स्पष्ट करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *