Big News : वाळूचा हायवा अडवल्याने वाळू तस्करांचा पोलिसांवर हल्ला;हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

अवैध वाळू तस्करांकडून बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव जवळ राजूर-फुलंब्री महामार्गावर पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडलीय.अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष दानवे या वाळू तस्करांवर बदनापूर तहसीलदार यांनी ३५३ चा गुन्हा दाखल केला होता. वाळूचा हायवा ट्रक ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना,सदर ट्रक गिरिजा नदी पात्रातून अवैध वाळू घेऊन डोंगरगाव मार्गे दाभाडीकडे येत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी डोंगरगाव शिवारात हायवा ट्रक अडवला असता, ट्रक चालकाने, पोलिसांनी आपला ट्रक अडवल्याची माहिती वाळू माफियांना दिली.मारुती स्विफ्ट कार मधून आलेल्या दोन महिला आणि चार ते पाच जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवल्याने आणि वाळू तस्करांच्या तावडीत सापडलेल्या पोलिसांना वाचवण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांनी हवेत गोळीबार केला.

या हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक रामोडे हे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनटेवाड यांनी घटनासाठी धाव घेऊन जखमी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक रामोडे यांना उपचरासाठी दाखल करत हायवा,मारुती स्विफ्ट कार,दोन महिला व चार जणांना दाब्यात घेतले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामोडे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे पोलीस प्रशासन आता तरी वाळू माफियांवर मोक्का अंतर्गत अथवा (एमपीडीए ) महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कयद्यांव्ये कारवाई करणार का ? अशी चर्चा आता जनतेतुन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *