Baramati Breaking : सांगवीत गॅस एजन्सी मालकाच्या घरी सिलिंडरचा स्फोट ; घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार प्रकरणी तिघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


कमर्शियल सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस
मशिनीद्वारे अल्टर करताना स्फोट झाल्याची चर्चा…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील सांगवी येथील निर्मल अरूण भारतगॅस एजन्सीच्या मालकाच्या घरी शनिवारी दि(१९) रोजी सकाळी १० च्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता.याच अनुषंगाने तपास केला असता कमर्शियल सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस मशिनीद्वारे अल्टर करताना स्फोट झाल्याचे उघडकीस आल्याने तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिन गव्हाणे,नितीन गव्हाणे आणि त्यांच्या घरातील एका महिलेवर भा.द.वि कलम १८८, २८५,३३८,३४ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमचे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुरवठा निरीक्षक संजय शिवाप्पा स्वामी, वय.४८ वर्षे ( रा. यादगार सिटी, फ्लॅट नं.१७,हरिकृपानगर,इंदापूर रोड बारामती ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर महितीनुसार, सांगवीत वाशिंग मशीनचे शॉर्टसर्किट झाल्याने गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती,त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता,गोडाउनमध्ये २० ते २५ मोकळ्या कमर्शियल सिलेंडरच्या टाक्या घरी आढळून आल्या.तसेच घर पुढील आवारात सिलेंडरने भरलेला एक पीकअप पुढे उभा करण्यात आला होता.आग लागताच हा पीकअप देखील तेथून हलविण्यात आला.असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती.त्या अनुषंगाने तपास करीत असताना,अशी माहिती मिळाली की,कमर्शियल सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस मशिनीद्वारे अल्टर करताना स्फोट झाल्याची माहिती मिळाली.

संशयित आरोपींनी कमर्शियल सिलिंडर जे गोडावून मध्ये न ठेवता घरीच मशीनद्वारे अल्टर करीत असताना
आजूबाजूच्या लोकांच्या जीवाला धोका होत असल्याचे माहीत असून देखील स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी अनाधिकृतरीत्या कामगार ओम बिष्णोई मार्फत घरगुती वापराच्या गॅस टाकीमधून व्यावसायीक वापराच्या टाकीमध्ये गॅस भरत असताना,सिलेंडर लिक झाल्याने, आग लागून त्यामध्ये त्यांचा कामगार ओम बिष्णोई याच्या छातीस व तोंडावर भाजून गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार फिर्याद देण्यात आली आहे.यामुळे आता बारामती मधील असे अनेक गॅस एजन्सी धारक अशा प्रकारे गॅसचा काळाबाजार करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून,अशा अनधिकृत पणे बेकायदेशीर कमर्शियल सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सी धारकांवर पुरवठा शाखा आणि पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं आहे.याबाबत अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *