इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर पोलिसांनी सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, चालक आणि मालक यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३२८ व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दि.(१८) रोजी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेची गस्त घालत गाड्यांची तपासणी करत असताना सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर कंपनीच्या ( टेम्पो क्र.AK.01 AL9121 ) गाडीला अडवून तपासणी केली असता, यावेळी पोलिसांना या वाहनात मानवी जीवनास अपायकारक ठरणाऱ्या व शासनाने बंदी घातलेल्या आर. के कंपनीचा गुटखा मिळून आला.पोलिसांनी तात्काळ या वाहनाला ताब्यात घेतले.इंदापूर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असून इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली अवैद्य गुटख्यावर तीन ते चार महिन्यातील ही चौथी मोठी कारवाई आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पोलीस उपअधीक्षक बारामती विभाग गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, पाटील,पोलीस उपनिरीक्षक लिगाडे, पाडूळे,पोलीस नाईक सलमान खान,मोहम्मद अली मडी,मोहोळे,मोहिते,पोलीस कॉन्स्टेबल काळे,राखुंडे,महिला पोलीस हवालदार खंडागळे, महादेव गोरवे आदी उपस्थित होते.