Big Breaking : संभाजी भिडेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आपल्या विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच त्यांनी संभाजी भिडे यांनी मुस्लिमांविरुध्द आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे संभाजी भिडे पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.त्यातच संभाजी भिडे पुन्हा एकदा बडबडले आहेत.त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू असल्याने संभाजी भिडे धारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात होते.

यावेळी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संभाजी भिडे मांडवगण फराटा आणि निर्वी येथे धारकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.यावेळी संभाजी भिडे म्हणाले, आपण धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत आहोत.पण सध्या हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आहे ते औरंगजेबाचे नाही.तर बांग्लादेश,पाकिस्तान आणि भारतातील मुस्लिम समाजाचे.तर हा समाज आपल्या समोर शत्रू म्हणून उभा ठाकला आहे. देशासाठी आणि धर्मासाठी संभाजी महाराजांनी ऐन तारूण्यात बलिदान दिले पण धर्म सोडला नाही.

त्यामुळे प्रत्येक हिंदूने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व्यर्थ जाऊ देऊ नयेत. छत्रपती संभाजी महाराजांनी हाल अपेष्टा सहन करून मरणाला प्रवृत्त करणारा इस्लाम धर्म आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा खरा शत्रू इस्लाम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.हिंदू समाजाने मुस्लिम समाजापासून सावध राहत पोट तिडकीने छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सूड घेण्याची आणि जशाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवायला हवी.तरच ती खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली असेल,असे वक्तव्य केले.संभाजी भिडेने केलेल्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *