मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबई पोलिसांनी ऐन होळीच्या तोंडावर तब्बल १ कोटी ३० लाखांचे ड्रग्ज मुंबई पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिहारमधून ड्रग्ज तस्करीसाठी मुंबईला आलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी गौरवकुमार प्रसाद वय.२० वर्षे आणि कृष्णकुमार पंडित वय.३० वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मुंबईच्या पोलिसांनी संतोषनगर परिसरातून चरस तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.होळीच्या सणासाठी मोठ्या फिल्म स्टार्सकडून पार्ट्यांचे आयोजन केलं जात. याच पार्ट्यांमध्ये हे ड्रग्ज तस्करी करणार असल्याची प्राथमिक माहितीत समोर आली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी तीन किलोहून अधिक चरस अंमली पदार्थ जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ३० लाख इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशी येथील संतोष नगर परिसरातील शिवशाही प्रकल्पात काही लोक चरस विकण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तेथे आलेल्या दोघांची चौकशी केली.तेव्हा त्यांच्याकडून तीन किलोपेक्षा जास्त चरस आढळून आले.मुंबई पोलीस आता अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांना हे चरस पुरवठा करणार होते.