बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील एकूण १८ विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी जाहीर झालेल्या यादीत स्थान मिळविले.ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.अशोक प्रभुणे,सचिव ॲड.नीलिमा गुजर, व ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून प्राजक्ता घुले,कल्याणी जावळे,प्रतीक्षा वनवे,अश्विनी कदम, दिपाली धालपे, संजय कोकरे, दत्तात्रेय बाराते, शैलेश मोरे, अशोक नरोटे, निलेश ओमासे, पृथ्वीराज बाराते, प्रमोद जगताप, शंकर पाटील,शुभम शिंदे, मनोज कदम,दिपक लोकरे, गौसे आझम, अनिकेत वाघ या विद्यार्थ्यांनी गणवत्ता यादीत स्थान पटकावले.या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.सुनिल ओगले यांनी लाॅकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली.कोविडच्या काळात ग्रंथालयातील वाचनकक्ष, संस्थेचे भव्य असे क्रिडांगण उपलब्ध करून दिले त्याबद्दल सुनेत्रावहिनी पवार व प्राचार्य डॉ. भरत शिंदे तसेच सर्व शिक्षक यांचेही आभार माणण्यात आले.