बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती शहरात दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत चार ते पाच जणांना ताब्यात घेत कारवाई केली होती,याच धर्तीवर आता बारामती शहर पोलिसांना जाग आली असून,शहरात अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले असून,मटका व जुगार घेणाऱ्या संशयित आरोपी सचिन हिरालाल साळुंखे वय.३२ वर्षे (रा.पानगल्ली,ता. बारामती ) राम बाळासाहेब काळे वय.२७ वर्षे ( रा.वाडेकरनगर,मूळ मालक अर्जुन राजू पाथरकर वय.२३ वर्षे ( बारामती ) विठ्ठल शामराव गायकवाड,वय.५५ वर्षे ( रा.गुणवडी,ता.बारामती ) राजेंद्र बाळासाहेब कोरडे,वय.५४ वर्षे ( रा.पिंपळी,ता.बारामती मूळ मालक शेखर सोनवणे ( बस स्टँड समोर आमराई ) अशोक सोनबा साठे,वय.६६ वर्षे ( रा.माळेगाव खुर्द ) मूळ मालक मयूर कांबळे यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील रोख साडे पाच हजार रोख रक्कम व मटका साहित्य जप्त करण्यात आले आहे.संशयित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, बारामती शहरात जुगार मटक्याचे प्रमाण वाढले असता, त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार,बारामती शहरात अचानकपणे कॉम्बिग ऑपरेशन राबविले असता,यामध्ये दोन पोलीस अधिकारी,पंधरा पोलीस कर्मचारी व दहा होमगार्ड यांची पथके तयार करून व सध्या वेशात पोलिसांची पथके तयार करून मटका दारू,गांजा विक्रीच्या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणाहून पाच जणांना ताब्यात घेतले असता,त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.संशयित आरोपींकडून रोख रक्कम साडेपाच हजार व मटका चिठ्ठी पेन व इतर जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.मटक्याच्या मूळ मालकांना देखील अटक करून त्यांच्यावर देखील योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पोलीस उपअधीक्षक बारामती विभाग गणेश इंगळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळक,सागर ढाकणे, सहाय्यक फौजदार संजय जगदाळे,पोलीस कर्मचारी कल्याण खांडेकर,तुषार चव्हाण,दशरथ कोळेकर,महेश भोसले,बंडू कोठे,दशरथ राऊत, दशरथ इंगवले,बीट मार्शल काळे आणि मोरे यांनी केलेली आहे.अवैध धंद्याबाबत माहिती मिळाल्यास आमच्या मोबाईलचा व्हाट्सअप नंबर ९८२३५६२२५५ वर लोकेशन कळवावे ही विनंती. व्हेरिफाय करून वस्तुनिष्ठ माहिती दिल्यास कारवाई करण्यात येईल.माहिती देणाराचा नंबर कुठेही शेअर केला जाणार नाही याची खात्री ठेवावी,असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केलेले आहे.
बातमी चौकट :
जर कुणी मटका जुगार चालवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन मूळ मालकाला अटक करण्यात येणार आहे.तसेच शहरातील अवैध दारु विक्री करणाऱ्या दहा लोकांना व गांजा विकणाऱ्या चार लोकांना चेक करण्यात आले.परंतु त्याठिकाणी पोलिस छाप्याच्या वेळी काहीही मिळून आले नाही. तसेच पानगल्ली,आमराई,देसाई इस्टेट,अशोक नगर या भागात विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर फिरणाऱ्या मोटर सायकल धारांना चेक करण्यात आले, यातील काही लोकांकडे विचारपूस केली त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले परंतु गुन्हेगार अशाच प्रकारे विना नंबर प्लेट गाड्या वापरून गुन्हे करत असतात त्यामुळे या प्रकारे चेकिंग घ्यावी लागेल.तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे,आणि आपल्या सर्व गाड्यांना अटी व मान्यताप्राप्त नंबर प्लेट लावून घ्या यापुढे या कारवाया सतत करण्यात येतील.