मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबई गुन्हे शाखेने अंगडिया खंडणी प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या कामावर आलेले नाहीत.त्यामुळे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषीत केल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
पोलीस उपायुक्तांना फरार घोषीत केल्याने महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे गुन्हे शाखेने याच प्रकरणात एल.टी.मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांना गेल्या आठवड्यात अटक केली होती.आता पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केले आहे.या संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत असून या प्रकरणात आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यावर मुंबादेवी परिसरातील अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची दखल अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी घेतली.त्यांनी या प्रकरणी तक्रार केली.त्यानंतर एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे,सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे या तीन अधिकाऱ्यांवर खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे.