Political Breaking : फडणवीसांना मिळालेल्या नोटिशीनंतर इंदापुरात भाजप आक्रमक ; हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत व्यक्त केला निषेध..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा झाला आहे.तर फडणवीसांना पोलिसांनी जबबा नोंदवण्यासाठी बोलावलं होतं, मात्र नंतर पोलीस घरी जाऊन जबाब घेणार असल्याची माहिती देण्यात आली.याचवरून आता भाजप आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करत नाही. तर त्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बाजावल्याने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यात देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.फडणवीसांना पाठविण्यात आलेल्या नोटीस ही बेकायदेशीर असून महाविकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्री व
नेत्यांचे बरेच घोटाळे उघडकीस येत आहेत.फडणवीस आणखी घोटाळे बाहेर ही काढतील त्यामुळे भाजपा नेत्यांना नामोहरण करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकारचे सुडबुध्दीचे राजकारण चालू असल्याचा घणाघाती आरोप मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

ज्यांनी घोटाळा झाल्याचे उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलवणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला मार अशी गत झाली आहे.असे गलिच्छ राजकरण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा हर्षवर्धन पाटील यांसह भाजपा पदाधिकारी,कार्यकत्यांनी यावेळी जाहिर निषेध नोंदवला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार मारुती वनवे,कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा माजी सभापती विलास वाघमोडे गटनेते कैलास कदम शहराध्यक्ष शकिल सय्यद इंदापूर अर्बनचे चेअरमन देवराज जाधव बापू जामदार संचालक सतिश व्यवहारे,माजी नगरसेवक गोरख शिंदे, सुनिल आरगडे आर.पी.आय (आठवले गट) तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *