प्रमोद साबळे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीत महिला दिनाचे औचित्य साधत बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये निर्भया पथक कशा पद्धतीने कार्य करते,वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करावा घरातील वातावरण आनंदी व हसत खेळत ठेवावे वयात आलेल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे जास्तीचे पैसे मुलांना न देणे एखाद्या वस्तूचा हट्ट केला तर ती लगेच न देणे त्या वस्तूचे महत्त्व त्यांना पटवून सांगणे शिस्त लावणे संस्कार करणे, ओळखीचे किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये त्यांच्या अत्याचारास बळी पडू नका याची पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची माहिती अमृता भोईटे यांनी दिली.
पोक्सो अॅक्ट,तसेच तक्रार कोठे व कशी द्यावी,न घाबरता व्यक्त व्हावे,अन्याय सहन न करता प्रतिकार करावा तसेच मुली व महिलांची सुरक्षितता याबाबत निर्भया पथक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे परंतु नैराश्यात जाऊन जीवन संपून नका जीवन एवढे स्वस्त नाही की ते आपण कोणासाठी तरी संपवावे आई-वडिलांचा आदर करणे समोर योग्य ते ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे वाईट मार्गाला न जाता चांगली संगत धरणे तसेच मुलांना आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर पोलीस चारित्र्य पडताळणी मध्ये तसे प्रमाणपत्र देऊन भविष्यात आपल्याला कुठेही सरकारी नोकरी मिळत नाही तरी आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही याविषयी काळजी घ्यावी.
अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले डायल ११२,१००,स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून अडचणीच्या वेळी पोलीसांची जास्तीत जास्त मदत घ्यावी असे आवाहन केले.सदर कार्यक्रमास सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक गावडे सर शाळेचे जनरल बॉडी सदस्य सतीश खोमणे, कोऱ्हाळे गावचे पोलीस पाटील शरद खोमणे, थोपटेवाडी गावचे पोलीस पाटील,थोपटे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका पाचवी ते नववी चा विद्यार्थिनी व माता-पालक तसेच प्रमुख पाहुणे अमृता भोईटे पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे असे उपस्थित होते.