Baramati Crime : जळोची येथील स्मशान भूमीच्या पाठीमागे मिळाला जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरातील जळोची येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे आज एका जळालेल्या अवस्थेत मध्ये पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह मिळालेला असून,या
इसमाची ओळख पटलेली असून त्याचे नाव अभिजीत विजय खरात वय.३५ वर्षे (रा.अंथूर्णे, ता.इंदापूर,जि.पुणे) सध्या रा.श्रीरामनगर,बारामती याठिकाणी राहत असून, खरात हे एक मेडिकलमध्ये कामाला होते.याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,घटनास्थळाची पाहणी केली असता,खरात यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेऊन रात्री उशिरा स्मशान भूमीच्या पाठीमागे आत्महत्या केलेली प्रथमदर्शनी दिसून येत असून,या प्रकरणाची अधिक चौकशी करून पुढील तपास करीत असून,संपूर्ण नातेवाईकांकडे व पोस्ट मार्टेम रिपोर्टचा अभ्यास करून पुढीलप्रमाणे योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाही करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

तपासणीसाठी त्यांचे प्रेत शासकीय रुग्णालयात पाठवले असून,याचा अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करत आहेत.घटनास्थळावर विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिलेली आहे. दरम्यान या अशा विचित्र प्रकारे आत्महत्या केल्याने बारामती शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून,खरात यांनी आत्महत्या केली की ? अजून वेगळे काय ? अशी जोरदार चर्चा सुरू असुन येत्या कालावधीत पोलीस तपासाअंती नक्की काय बाहेर येतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *