Baramati News : बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनासाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी नवीन मालिका सुरू..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारणेबाबत व लिलाव कार्यपध्दती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच परिवहन संवर्गातील चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.ज्या खाजगी चारचाकी वाहनांना परिवहन संवर्गातील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक तीनपट शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात १४ मार्च रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २.०० दरम्यान अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी १५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.

यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी.डी.जमा करावयाचा असेल त्यांनी १५ मार्च रोजी दुपारी २:०० वाजेपर्यत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा.१६ मार्च २०२२ रोजी दुपारी ०४:०० ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाकिट उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.अर्ज कार्यालयाच्या वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी),पत्त्याचा पुरावा,आधारकार्ड,ओळखपत्र पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा.हा डीडी ‘Dy. R.T.O. Baramati’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील असावा.अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दुरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

दि.१७ मार्च रोजी फक्त परिवहन संवर्गातील वाहनाकरिता आकर्षक पसंती कमाकांचे विहित शुल्कासह अर्ज सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत स्विकारले जातील.या संवर्गातील एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी २१ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यत नोटीस बोर्डावर लावण्यात येईल.यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी २१ मार्च रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा.त्‍याच दिवशी दुपारी ४.०० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर संबंधित लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क सरकारजमा होईल.कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *