महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज : भास्कर दामोदरे ( सहसंपादक )
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील गाव कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यावर अज्ञात तीन वाळू तस्करांनी लाकडी दांडक्याने जबर मारहाण तसेच प्राणघातक हल्ला केला. प्राणघातक हल्ला करुन तलाठी यांना जीवे मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. आहेत.शेवगाव-गेवराई महामार्गावर असणाऱ्या सोनेरी फाट्याजवळ हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की,बालमटाकळी या गावात वाळूचा एक ट्रॅक्टर वाळू भरून घेऊन येत आहे.त्यानुसार त्यांनी गावात असलेल्या बालंबिका देवी मंदिराजवळ सदरील ट्रॅक्टर पकडले आणि ते घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयात घेऊन येत असताना वाळू तस्करांनी हल्ला केला.