Political News : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांचा जलवा ! तब्बल ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘असा’ विक्रम,वाचा सविस्तर..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे काही दिवसांपूर्वी राज्यातील निवडणूका पार पडल्या. निवडणूक पार पडल्यानंतर प्रत्येक राजकीय नेत्याला आतुरता असते ती निकालाची. नुकताच गोरखपूर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मधील शहरी मतदार संघामधून निवडणूक लढवली आहे. त्यांना जवळपास ५३.३० टक्के लोकांनी मतदान केले आहे.४५ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मागील वेळेच्या म्हणजेच २०१७ च्या तुलनेमध्ये यावेळी २.३२% ने वाढ झाली आहे. २०१७ मध्ये येथील ५०.९८% लोकांनी योगींना मतदान केले होते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झाले आहे.

मुख्यमंत्री योगी यांच्या जागेवर मतदानाची टक्केवारी वाढल्याने राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. लोक मतदान वाढवण्याचा राजकीय अर्थ काढत आहेत.अशा परिस्थितीत गोरखपूरच्या या जागेवर १९९१ पासून आतापर्यंत काय घडले हे आम्ही तुम्हाला आकडेवारीच्या माध्यमातून सांगणार आहोत. तसेच मतदानात वाढ आणि घट याचा फायदा कोणाला झाला? हे देखील जाणून घेऊ.

वर्ष  उमेदवार  पक्ष    मतदान

१९९१  शिवप्रताप शुक्ल      (भाजपा)  ४३.४%
१९९३  शिव प्रताप शुक्ल     (भाजपा) ४७.७%
१९९६  शिव प्रताप शुक्ल    (भाजपा)  ३८.०%
२००२  डॉ.राधामोहन दास अग्रवाल (हिंदू महासभा)  ३३.१%
२००७ डॉ.राधामोहन दास अग्रवाल  (भाजपा) २८.६%
२०१२  डॉ.राधामोहन दास अग्रवाल  (भाजपा)  ४६.२%
२०१७  डॉ.राधामोहन दास अग्रवाल (भाजपा) ५०.९८%

१९८९ पासून गोरखपूरमधील शहरी जागा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आहेत. योगी आदित्यनाथ आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये २००२ मध्ये तिकीट वाटपावरून मतभेद झाले होते.त्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभेच्या डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांच्या तिकिटावर योगी आदित्यनाथ यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती.अग्रवाल जिंकले होते.मात्र, २००७ पासून डॉ.राधामोहन यांनी भाजपच्या तिकिटावर सलग तीन वेळा निवडणुका जिंकल्या आहेत.जर गेल्या
४५ वर्षांच्या आकडेवारीचे विचार केला,तर जेव्हा-जेव्हा मतदान वाढले,तेव्हा त्याचा फायदा भाजपला झाला. म्हणजे मतदान जास्त झाले तर भाजपच्या विजयाचे अंतरही वाढते.२००७ मध्ये सर्वात कमी २८.६% मते पडली,त्यानंतर भाजपचे डॉ.राधामोहन अग्रवाल २२,३९२ मतांनी विजयी झाले.अग्रवाल यांना ४९,७१५ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले समाजवादी पक्षाचे भानू प्रकाश मिश्रा यांना २७,३२३ मते मिळाली.२०१२ मध्ये मतदान २८.६% वरून ४६.२% पर्यंत वाढले. त्यानंतर भाजपच्या विजयाचे अंतरही सुमारे चार टक्क्यांनी वाढले. त्यानंतर डॉ. राधामोहन अग्रवाल ४७,४५४ मतांनी विजयी झाले. डॉ. अग्रवाल यांना ८१,१४८ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या समाजवादी पक्षाच्या राज कुमारी देवी यांना ३३,६९४ मते मिळाली.

२०१७ सालीच्या निवडणुकी दरम्यान सुमारे चार टक्क्यांनी मतदान वाढले.त्यानंतर ५०.९८% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्यानंतर भाजपचे डॉ. राधामोहन अग्रवाल ६०,७३० मतांनी विजयी झाले. डॉ. अग्रवाल यांना १,२२,२२१ मते मिळाली, तर काँग्रेसचे राणा राहुल सिंग दुसऱ्या क्रमांकावर होते.राहुल यांना ६१,४९१ मते मिळाली.राजकीय विश्लेषक प्रा.अजय सिंह सांगतात की, मतदानामध्ये वाढ होण्याचे दोन अर्थ आहेत. पहिल म्हणजे सरकार उमेदवाराविरुद्धची अँटीकंबन्सी आणि दुसर म्हणजे उमेदवार किंवा पक्षाची लाट.दुसरे कारण गोरखपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवणे हे अधिक असू शकते.ज्येष्ठ पत्रकार प्रमोद श्रीवास्तवही म्हणतात, ‘गोरखपूरची ओळख आता योगी आदित्यनाथ यांच्याशी अधिक जोडली गेली आहे.अशा स्थितीत मतदानाच्या टक्क्यामध्ये वाढ होणे हे योगींसाठी अत्यंत चांगले लक्षण ठरू शकते.’


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *