Political News : भाजपाला चार राज्यात मिळालेल्या यशामुळे बारामतीत भाजप कार्यकर्त्यानी फटाके,लाडू वाटत केला जल्लोष साजरा..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज : भास्कर दामोदरे ( सहसंपादक )

उत्तरप्रदेश,मणिपूर,उत्तराखंड,गोवा चार राज्यात भाजपला मोठं यश मिळाल असून,आज देशभर जल्लोष साजरा केला असून,बारामतीत देखील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकात फटाके,लाडू, वाटत आणि ढोल ताशा वाजवत जल्लोष साजरा केला आहे.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत चौक दणाणून सोडला.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर जनतेने प्रचंड विश्वास दाखविला त्यामुळेच आज आपल्याला पुन्हा एकदा आपण एका बलाढ्य पक्षाचे आनंदोत्सव साजरा करण्यास मिळत आहे.

हे यश चारही राज्यातील कार्यकर्त्यांचे असून भाजपा पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा सार्थ अभिमान असल्याने बारामतीत भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रथम आनंदोत्सव साजरा करण्यात आला.व नंतर भिगवण चौक येथे ‘ढोल ताशाच्या गजरात फेरी काढत घोषणाबाजी करत,लाडू वाटून आंनदोस्तव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते,शहराध्यक्ष सतीश फाळके,अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र प्रदेश सदस्य सचिन साबळे,युवा मोर्चाचे अध्यक्ष ऍड.ज्ञानेश्वर माने,शहर सचिव संतोष जाधव, राजेश कांबळे,तालुका उपाध्यक्ष सुधाकर पांढरे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष धनंजय गवारे,सोशल मीडियाचे सहसंयोजक अक्षय गायकवाड प्रमोद डिंबळे,संदीप अभंग,निरंजन जवारे,संदीप केसकर,कार्यालयीन मंत्री रघु चौधर महिला पदाधिकारी सुनीता झेंडे,सारीका लोंढे अश्विनी साबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *