Big Breaking : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस,सदस्यांच्या खोट्या सह्या करून ग्रामपंचायत कार्यालय हलवण्याचा बोगस ठराव मंजूर..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील सोनकसवाडीचे ग्रामपंचायत हे कित्येक वर्षांपासून शिवपुरी या ठिकाणी असताना, शिवपुरी ग्रामपंचायत कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवताना ग्रामसभेचा ठराव आवश्यक असताना, मासिक मिटींगला सर्व सदस्य उपस्थित नसताना,त्यांच्या खोट्या सह्या करून ग्रामपंचायत कार्यालय परस्पर हलविण्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात घडला असून,याबाबत शिवपुरीच्या गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बेकायदेशीर कामाचा निवेदन देत निषेध व्यक्त केला.

याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनकसवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून तब्बल १९८९ पासून त्यांचे ग्रामपंचायत कार्यालय हे शिवपुरी या ठिकाणी असून,शिवपुरी कार्यालय हे ग्रामपंचायत कोणताही ठराव न घेता मासिक मीटिंग सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसताना,खोट्या सह्या करून बोगस ठराव मंजूर करण्यात आला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी व काही निवडक ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतवर केला आहे.तसेच या ठरावाला वार्ड क्र.२ आणि वॉर्ड क्र.३ या वॉर्डमधील सदस्यांचा व ग्रामस्थांचा विरोध असताना देखील मनमानी पध्दतीने चालविलेल्या कारभाराचा शिवपुरी गावातील तमाम ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला.ज्याठिकाणी कामाचे भूमिपूजन झाले, त्याठिकाणचे कामकाज त्वरित थांबवण्यात घेऊन,त्वरित ग्रामसभा बोलावून ठराव झाल्यानंतर जो निर्णय होईल तोच घेतला जाईल अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *