बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबईसह पुण्यात आयकर विभागाची कालपासून छापेमारी सुरू आहे.यामध्ये वादग्रस्त असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली होती.त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.यामध्ये खरमाटे यांचे निकटवर्तीय असलेले साहेबराव काका खरमाटे यांच्या नावावर असणारी मालमत्ता घाईगरबडीने का विकली ? हे सुरू असताना मात्र खरमाटें कुटुंबीयांच्या नावावर असलेली मालमत्ता लपवण्यासाठी बारामती मधील पै पाहुण्यांनी मात्र जोरदार पुढाकार घेतल्याचा दावा क्रांतिकारी आवाज संघटनेचे मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे.
बजरंग खरमाटे हे पूर्वी नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उपपरिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत असून,परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जवळचे ते मानले जातात.मंत्री अनिल परब आणि अधिकारी बजरंग खरमाटे यांनी एकत्रित मिळून कोट्यवधीचा घोटाळा केला.नंतर ते पैसे आपापसात वाटून घेतले,असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला होता.बारामतीमध्ये देखील बजरंग खरमाटे यांची बेकायदेशीर संपत्ती असल्याचा आरोप देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता,तसेच त्या जागेची पाहणी देखील करण्यात आली होती. जळोची मध्ये असणाऱ्या गट क्र.१९६/२ या जागेमध्ये बांधकाम सुरू होते याची देखील पाहणी करण्यात आली होती.
यामध्ये मात्र खरमाटे कुटुंबियांच्या बारामती मधील इतर मालमत्तेची माहिती देखील भाजपचे नेते किरीट सोमय्यांना,नव्हती की काय ? अशीच चर्चा देखील सुरू आहे.यामुळे आता आयकर विभाग बारामती मधील खरमाटे कुटुंबीयांची मालमत्ता लपविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या बारामतीमधील पै पाहुण्यांची चौकशी करणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.यामुळे आता ही मालमत्ता लपविण्यासाठी बारामतीच्या पै पाहुण्यांनी केलेला खटाटोप फेल ठरणार की काय ? अशी चर्चा देखील जोरदार सुरू आहे.यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणा देखील बारामतीकडे आपला मोर्चा वळवणार का ? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या देखील बारामतीत येणार ? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.