विशेष म्हणजे ही मालमत्ता विकत घेणाऱ्यामध्ये बारामतीतील एक मोठा मॉल व्यावसायिक आणि अन्य काही लोकांचा सहभाग…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात सध्या ईडी आणि आयटी विभागाची कारवाई जोरदार सुरू असून,पुणे आणि मुंबई शहरात देखील सकाळपासून धाडींचे सत्र सुरू आहेत.काल देखील पुण्यातील खरमाटेंच्या घरावर आयटी विभागाने धाड टाकल्याची सूत्रांची माहिती आहे.तसेच यापूर्वीही प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी बारामती दौरा केला होता.याठिकाणी किरीट सोमय्या यांनी बजरंग खरमाटे यांच्या नावावर असलेल्या जागांची पाहणी देखील केली होती.यामध्ये बजरंग खरमाटे यांची जळोची हद्दीतील गट नं.१९६/२ पैकी,क्षेत्र असलेल्या ४०००.०० चौ.मी या जागेत बांधकाम असलेल्या ठिकाणी पाहणी केली होती.सदरची जळोचीमधील जागा ही खरमाटे यांचा मुलगा प्रथमेश बजरंग खरमाटे याच्या नावावर होती,या जागेवर तब्बल ४०००.०० चौ.मी मध्ये चार मजले बांधकाम असलेले रो हाऊस क्र.१ ते ४ याला बारामती नगरपरिषदेत २० मे २०१९ रोजी परवानगी मागण्यात आली होती,त्यानुसार १७ फेब्रुवारी २०२० ला या जागेवर बांधकामासाठी परवानगी देण्यात आली होती.आणि याच जागेवर असलेल्या बांधकामाची पाहणी किरीट सोमय्या यांनी केली होती.
वास्तविक पाहता प्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले बजरंग खरमाटे हे दोन वेळा निलंबित झालेले अधिकारी आहेत.तसेच ते पूर्वी परिवहन खात्याचे मंत्री असलेले यांच्या जवळचे मानले जायचे.खरमाटे यांनी अमाप बेकायदा संपत्ती जमा केलेली आहे.त्यांचा औंध पुणे येथे बंगला आहे.वाकड, पाषाण,औंध,सिहगड रोड येथे एलजी कंपनीचे शोरूम्स आहेत. टाटा तनिष्क कंपनीचे गोल्ड ज्वेलरीचे दोन शोरूम,इंदोर व कोथरूड पुणे येथे आहेत. फिनिक्स मॉल,अहमदनगर रोड, पुणे येथे आठ गाळ्यांचे पतंजली प्रोडक्टचे मॉल आहेत.ही सर्व संपत्ती त्यांनी त्यांच्या नावावर न करता त्यांची पत्नी संगीता आणि मुलं प्रथमेश,प्रतीक आणि श्रेयांश आणि काही मालमत्ता भाऊ पोपटराव आणि साहेबराव यांच्या नावाने असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात आणि मुंबईत छापा सुरू असताना,मात्र किरीट सोमय्या यांना देखील खरमाटे यांच्या बारामतीत असणाऱ्या दुसऱ्या जागेविषयी माहिती नव्हती की काय असे म्हणावे लागेल.कारण सकाळ पासून केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे पुण्यात आणि मुंबईत धाडी चालू असताना, काल देखील खरमाटे यांच्या घरावर आयटीने छापा मारल्याची सूत्रांची माहिती आहे.गेल्या चार दिवसांपुर्वी बारामती MIDC मधील नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीत त्यांच्या सख्ख्या भावाच्या साहेबराव काका खरमाटे यांच्या नावावर असलेल्या गट नं. ११४/१/१/१/२ पैकी बिनशेती प्लॉट मध्ये अनेक प्लॉट मधील हे क्षेत्र हे विक्री केल्याचे दिसून आले आहे.यामुळे आता खरमाटे यांना ईडीची किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या रेड होण्याची कुणकुण आधीच लागली होती की काय ?
त्यामुळे खरमाटे यांनी अगदी तातडीने घाई गडबडीत त्यांचे सख्खे भाऊ साहेबराव काका खरमाटे यांच्या नावावर असलेली रुई येथील NA जमीन प्लॉट हा पाच दिवसापूर्वी म्हणंजेच ३ मार्च आणि ४ मार्च २०२२ रोजी विकली आहे.विशेष म्हणजे या जमिनीचे एकाच दिवशी तब्बल ३१ खरेदीदस्त झाल्याची माहिती समोर आली आहेत.यामुळे आता बजरंग खरमाटे यांच्यावर पुन्हा चौकशी लागणार की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यामुळे सदरील प्लॉट विकत घेणाऱ्या लोकांची चौकशी होणार का ? विशेष म्हणजे ही मालमत्ता विकत घेणाऱ्यामध्ये बारामतीतील एक मोठा मॉल व्यावसायिक आणि अन्य काही लोकांचा सहभाग आहे.यामुळे आता जर खरमाटे च्या प्रॉपर्टीवर कारवाई झाली तर लाखो रुपये खर्चून घेतलेल्या प्रॉपर्टी चे काय ? असा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.