इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित करण्याचा धडाका लावल्याने आज इंदापुरात पुणे-सोलापूर महामार्गावर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी बोलताना पाटलांनी मात्र राज्यमंत्री भरणे यांच्यावर जहरी टीका केली यावेळी पाटील म्हणाले की, काल राज्यमंत्र्यांनी न्हावीला जात अंधारात उद्घाटन केले. एखादा मंत्री गावामध्ये जातो आणि अनं त्या गावचा लाईनमन जर तुमचं ऐकत नसेल तर राजीनामा द्या.!! आम्ही बघतो काय करायचं ते” अशी जळजळीत टीका हर्षवर्धन पाटीलांनी भरणे यांचे नांव न घेता केली आहे.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की,संजय मामाने सांगितले की लाईट जोडा लाईट जोडली,राम सातपुतेंनी सांगितले लाईट जोडा लाईट जोडली,दौंडच्या आमदाराने सांगितले आम्ही आंदोलन करु तिथली लाईट जोडली.पणं इंदापूरचा मंत्री असताना इथली लाईट का तोडली ? इंदापूर तालुक्यातील शेतकरी काय पाकिस्तानमध्ये राहतोय काय ? का तो चोर आहे. आणि आज तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुग गिळून गप्प का ? अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे आपल्याला रस्त्यावर बसण्याची पाळी आली आहे.आणि याला केवळ तालुक्याचे आमदार जबाबदार आहे असा आरोप पाटील यांनी केला.
तसेच पाटील म्हणाले की,मी ही वीस वर्षे मंत्री होतो.जर एखाद्या गावात मंत्री यायचा म्हटलं तर त्या गावात रांगोळी काढली जायची, त्या गावात महिला औक्षण करायच्या आणि आलेल्या मंत्र्याचे स्वागत करायच्या सर्व अधिकारी व ग्रामस्त उपस्थित असायचे मात्र आज इंदापूर तालुक्यात उलट स्थिती आहे.एखादा मंत्री गावामध्ये जातोय अनं त्या गावचा लाईनमन जर तुमचं ऐकत नसेल तर राजीनामा द्या अशी कोपरखळी देखील पाटील यांनी भरणे यांना मारली.
त्या काटेवाडीची जागा कोणी घेतली ? आत्तापर्यंत काटेवाडीची माणसं इंदापूरची जागा घेत होती. आता परिवर्तन झाले आहे.इंदापूरचे पुढारी आता काटेवाडीच्या माणसांच्या जागा खरेदी करायला लागले एवढा पैसा आला कुठून ? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.यावेळी या आंदोलनात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.