चूक दुरुस्त करत केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्तुती..
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मागील काही दिवसांपासून भरसभेत बोलताना,इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या डोक्यातुन मात्र मुख्यमंत्री म्हणून अजून देखील देवेंद्र फडणवीस यांचेच नाव दिसत आहेत.यापूर्वीही इंदापूर येथील भरसभेत दत्तात्रय भरणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव विसरले होते.काल देखील भर सभेत बोलताना,मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अर्धवट नाव घेतले.मात्र वेळेचे प्रसंगावधान राखत भरणे यांनी लगेच आपल्या चुकीची दुरुस्ती करत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच नाव घेत त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली,आणि आलेली वेळ मारून नेली.माणूस टेंन्शनमध्ये असतो असे म्हणत मागील वेळेसारखी चूक त्यांनी वेळ मारून नेली.
राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील शहा गावात १२ कोटी १५ लाख निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ करण्यात आला.यावेळी
सभेत उपस्थितांना बोलत असताना, भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र एवढे म्हणताच त्यांना त्यांची चूक समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला, त्यामुळे चुकता चुकता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे दुरुस्त झाल्याचं यावेळी उपस्थितांना दिसून आले.
याअगोदरही भरणे यांच्या १४ फेब्रुवारीच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आयोजित कार्यक्रमात भरणेंना चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा विसर पडलेला दिसून आला होता,यावेळी भरणे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याने व्यासपीठवर हास्यकल्लोळ माजला होता.त्यानंतर आयोजकांनी त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त केली होती.काल ही शहा या गावी सभेत बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र..असा उल्लेख करताच त्यांना त्यांची चूक कळली व लगेच त्यानी ती दुरुस्त केली. त्यामुळे अजूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मनातील “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस” च आहेत की असा प्रश्न निर्माण सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.