दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यामध्ये तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून, एकाच कुटुंबातील दोघे भाऊ असल्याची देखील माहिती समोर आली आहे.या घटनेतील आसरार अलीम काझी, वय.२१ वर्षे,अतिक उझजमा फरीद शेख,वय.२० वर्षे, करीम अब्दुल हादी फरीद काझी,वय.२० वर्षे अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.दौंड प्रशासन ढिम्म झालेले पहायला मिळाले शोध महिमेस कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्याने शोध महिमेस विलंब लागला.अथक प्रयत्नानंतर नागरिकांच्या व मासेमारी करणाऱ्या युवकांच्या व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने मध्यरात्री उशिरा शोधण्यात आले.मृत्यू पडलेले युवक फोटोशूट व पोहण्यासाठी गेले असल्याचे म्हटले जात आहे.एकाच कुटुंबातील दोघेजण व अन्य युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे तीनही विद्यार्थी शहरातील नवगिरे वस्ती येथील रहिवासी आहेत, हे तिघे मित्र ६ मार्च रोजी दुपारी ४.०० च्या दरम्यान दुचाकी घेऊन फिरावयास घराबाहेर पडले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल बंद होता, त्यांच्याबरोबर असलेल्या मित्राला मोबाईल वर संपर्क साधला असता त्याच्या मोबाईलची फक्त रिंग वाजत होती परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिघांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावेळेस तिघेही नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर जाणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे घरच्यांनी या परिसरामध्ये त्यांचा शोध घेत असताना तलावाशेजारी त्यांची दुचाकी, कपडे व बॅग नजरेस पडली. पाण्यात बुडाले असल्याची शंका त्यांना आली त्यामुळे त्यांनी दौंड पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसही तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेत तलावातील पाण्यात मुलांचा शोध घेतला. साधारणतः रात्री १२ ते १२.३० वा च्या दरम्यान तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. तिघेही मित्र तलाव परिसरात फोटो शूट साठी गेले होते त्यापैकी एक पाण्यात उतरला बहुदा त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला मात्र दोघांनाही पाण्याबाहेर पडता येत नाही व ते बुडत आहेत हे दिसल्याने तिसरा मित्रही त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला तिघेही पाण्यात बुडाले असावेत अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी होत आहे.तिघांचे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले त्यावेळेस एकाच्या हातामध्ये मोबाईल आढळला अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. मृतांपैकी असरार हा बीए परीक्षा उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत होता. तर त्याचा चुलत भाऊ करीम व त्याचा मित्र अतिक हे दोघेही पुना कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स चे शिक्षण घेत होते. अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली. तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.