Political Breaking : वीज तोडणी प्रश्नांवरून महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यमंत्र्यांच्या घरासमोरच भाजपचे निषेध आंदोलन..घुमला दत्ता भरणे हाय हाय चा नारा..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क…

वीजतोडणी प्रश्नावरून सध्या महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले असताना,इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार व राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील घरासमोर सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज निषेध आंदोलन केले.विज तोडणी प्रश्नावरून महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन होत असताना पहिल्यांदाच यावेळी मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन झाले आहे.युवा शेतकरी सुरजने वीज,कर्जबाजारी,दुधदर याला कंटाळून त्याच विवंचनेतून आत्महत्या केली परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या दत्ता मामा भरणे यांना सदर कुटुंबाला एक पालक म्हणून भेटायला वेळ नाही.

तात्काळ शासकीय मदत नाही याच्या निषेधार्त त्यांच्या घरासमोर सुरज जाधवचा फोटो पुजन करून न्याय देण्याची मागणी केली.आंदोलकांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.कर्जाच्या प्रश्नावर सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली .ही शेवटची आत्महत्या ठरवायचे असेल तर सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत.अन्यथा सुरज जाधवाचा दशक्रिया विधी पालकमंत्र्यांच्या दारात करण्याचा इशारा देण्यात आला.आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते,ते त्यांच्या निवासस्थानी नव्हते.

त्यामुळे यावेळी पोलिसांनी आंदोलकांना चार किलोमीटर अंतरावर वरच रोखले,यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काहीवेळ खडाजंगी झाली, आंदोलक अधिक आक्रमक झाले व त्यांनी तेथूनच मोर्चा काढत अखेर राज्यमंत्री भरणे यांचे निवासस्थान गाठले,व तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी भाजप किसान मोर्चाच्या वतीने हे आंदोलनं करण्यात आले.यावेळी किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर,सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे,लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *