दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यात सोसायटी निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आदेश मिळाला असताना,राहू परिसरात पेट्रोलिंग करीत असताना,एकाच वेळी तब्बल ४ गावठी पिस्टल,१ रिव्हॉल्वर व १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी संशयित आरोपी दिनेश महादेव मोरे,वय. २३ वर्षे ( रा.राहू,ता.दौड ), अभिषेक उर्फ बारकू राजेंद्र शिंदे वय.२० वर्षे ( रा.भांडवाडी, महात्मा फुले चौक राहू,ता.दौड ) अमोल शिवाजी नवले,वय.३० वर्षे ( रा.कुंबडमळा सहकारनगर राहु,ता.दौड ),सचिन शिवाजी चव्हाण,वय.२३ वर्षे ( रा.मारूती मंदिरामागे राहू,ता.दौड ) आणि परमेश्वर दथरथ कंधारे,वय.२३ वर्षे ( सध्या रा.भांडवाडी राहू,ता. दौड,मूळ रा.वडीपुरी,ता.लोहा जि.नांदेड ) यांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून तब्बल ४ गावठी पिस्टल,१ रिव्हॉल्वर आणि १३ जिवंत काडतुसासह ४ मोबाईल फोन असा २ लाख ९१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,
सोसायटी निवडणुकीमुळे अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक राहू परिसरात पेट्रोलिंग करीत असताना,पोलीस हवालदार निलेश कदम व गुरूनाथ गायकवाड यांना माहिती मिळाली की,राहू गावातील महात्मा फुले चौकात दिनेश मोरे व अभिषेक शिंदे व त्यांचे इतर तीन साथीदार हे बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगून आहेत.त्यामुळे यवत पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी जात,दिनेश व अभिषेक यांच्यासह त्याचे साथीदार अमोल नवले,सचिन चव्हाण,परमेश्वर कंधारे यांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असता,यावेळी त्यांच्याकडे ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्हर, १३ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन असा तब्बल २ लाख ९१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,पोलीस उपअधीक्षक दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड,संतोष कदम,रामदास जगताप,रविंद्र गोसावी, अजित काळे,प्रमोद गायकवाड अजिक्य दौडकर यांच्या पथकाने केली आहे.