Baramati Crime : अखेर बारामतीत अटक केलेल्या आरोपीचे पिस्टल रॅकेट उघड.. विक्री केलेले दोन पिस्टल शहर पोलिसांनी केले हस्तगत..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरातील देशमुख चौकात विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या आरोपी देवेंद्र उर्फ बंडू हुकूमचंद यादव,वय.२७ वर्षे मूळ ( रा. हंडीया खेडा,ता. खंडवा,जि.खंडवा,मध्यप्रदेश ) या सराईत गुन्हेगाराला बारामती शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली होती, त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली होती.त्याच्या चौकशीत संशयित आरोपी दिलीप दिनकर शेळके, वय.४७ वर्षे ( विश्रांतवाडी पुणे ) याला दोन देशी बनावटीचे पिस्टल व दहा जिवंत काडतुसे दिल्याचे कबूल केले असता,दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,बारामती शहरातील पाटस रोड वरील देशमुख चौकात मध्यप्रदेशातील आरोपीला पिस्टल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले होते,त्यानुसार अधिक चौकशी केली असता, त्याने दोन पिस्टल व दहा जिवंत काडतुसे पुण्यातील बँक व फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या दिलीप शेळके याला दिली असल्याचे कबूल केले. शहर पोलिसांनी तात्काळ दिलीप शेळके याला ताब्यात घेतले असता शेळके हा पिस्टलची धाक वसुली करण्यासाठी करत असल्याची माहिती मिळाली. संशयित आरोपी शेळके याला न्यायालयात हजर केले असता,कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.या आरोपीने विक्री केलेली तीन देशी पिस्टल असे अंदाजे एक लाखाचे हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,शहर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस अंमलदार अभिजीत कांबळे,तुषार चव्हाण,बंडू कोठे, दशरथ कोळेकर,गौरव ठोंबरे,शाहू राणे यांच्या पथकाने केलेली आहे.

बातमी चौकट :

अग्निशस्त्रांचा वापर गुन्ह्यांमध्ये झाल्यानंतर जनतेमध्ये घबराट निर्माण होते तरी,त्याचा वापर होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहत,जर कोणाकडे अग्निशस्त्र असतील त्याबाबत नागरिकांनी तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्याला द्यावी.

सुनील महाडिक ( पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *