महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सातारा येथील महिला फिर्यादीने तिच्या पतीकडून हातऊसने घेतलेले पैसे पाडेगावचे पोलीस पाटील राणी डोईफोडे यांना २३ मार्च २०२१ रोजी मागितले असता तीने व इतर चार जणांनी फिर्यादी महिलेला बेदम मारहाण केली व फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देत पोलीस पाटलाचे पती संतोष डोईफोडे याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केलेल्या आरोपी राणी डोईफोडे,संतोष डोईफोडे,शारदा डोईफोडे,सुरेश डोईफोडे व ओंकार डोईफोडे यांचेवर भारतीय दंड संहिता कलम ३५४ (ब),३२३,५०४,५०६ ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्याचा आदेश लोणंद पोलीस स्टेशनला दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी महिलेवर झालेल्या अन्यायामुळे तिने लोणंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याची विनंती केली परंतु लोणंद पोलीस स्टेशनने सदरचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली,त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस ग्रामीण अधीक्षक सातारा या ठिकाणी देखील तक्रार केली परंतु तिच्या पदरी निराशाच पडली शेवटी फिर्यादी महिलेने तिची फिर्याद मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, खंडाळा येथे दाखल केली.कोर्टाने कागदोपत्री पुरावा व फिर्यादीचे वकिलांचा युक्तिवाद ग्राय धरत आरोपी राणी डोईफोडे,संतोष डोईफोडे,शारदा डोईफोडे,सुरेश डोईफोडे व ओंकार डोईफोडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश लोणंद पोलीस स्टेशनला दिला,त्यानुसार दि.२५ फेब्रुवारी २०२२ रोजी लोणंद पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी तर्फे एडवोकेट गौरव नांगरे यांनी काम पाहिले व त्यांना ऍड संजय महामुनी व ऍड.संतोष चोपडे यांनी सहकार्य केले.