इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक मधील दोन पठ्ठ्यांनी आपल्या शेतातील भुईमूग व लसणाच्या पिकात अफूचे आंतरपीक घेत शेती करणाऱ्या संशयित आरोपी पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे ( दोघेही रा. वरकुटे बुद्रुक,ता.इंदापूर,जि.पुणे ) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात अंमली औषधीद्रव्य व मनु : प्रभावी पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम ८,१५ १८,३२, ४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वाघ यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील शेतकरी पांडुरंग कुंभार यांनी त्यांच्या शेतातील गट नंबर २४ मध्ये व नवनाथ शिंदे यांनी गट नंबर २८/२ मध्ये भुईमूग व लसणाच्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली बेकायदेशीरपणे लागवड केली होती.अशी माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली असता, पोलीसांनी जात पाहणी केली असता, त्यांच्या शेतातून अफूच्या ओल्या ३२ किलो वजनाच्या बोंडासह झाडाची सरकारी किंमत अंदाजे २ लाख ११ हजार ३०० रुपयांची झाडे ताब्यात घेतली आहेत.ही कारवाई २ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे,नागनाथ पाटील,माने,कॉन्स्टेबल वाघ, नागराळे,कोठावळे,राखुंडे हवालदार बापू मोहिते,गाढवे यांनी केलेली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.