Breaking News : राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई ; कारवाईत ५ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

नागठाणे गावच्या हद्दीत बाबा पंजाबी ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा क्लोरेल हायड्रेड चा वापर करुन बनावट ताडी तसेच मानवी शरीरास घातक व विषारी क्लोरेल हायड्रेट तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून संबंधितांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली असून,संशयित सुहास हणमंत सांळुखे,विजय जयसिंग सांळुखे,मे.कानी ओव्रसिस कार्पोरेशन,अतित ता.जि.सातारा) कंपनीचा मालक मिलींद तुकाराम घाडगे (रा.नागठाणे,ता.जि. सातारा आरोपी राजू व्यंकट नरसय्या भिमानाथीनी(रा. नेवोली नाका,डोंबिवली,कल्याणपूर्व,जि.ठाणे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ब)(ड)(ई) (फ),६८,८१,८३,९०, १०३ तसेच विष कायदा १९१९ चे कलम २,६ चे उल्लंघन,महाराष्ट्र विष नियम १९७२ चे कलम २(फ),३,१२ चे उल्लंघन,भा.द.वि कलम १८६० चे नियम क्र.३२८ अंतर्गत गुन्हा नोंद केली आहे.

या कारवाईत १५० लि क्लोरेल हायड्रेड युक्त बनावट ताडी,७३५ कि.ग्रॅ.क्लोरेल हायड्रेड,एक चारचाकी वाहन एक २०० लि.क्ष.चा प्लॅस्टिक बॅरल व एक कॉम्प्रेसर असा ५ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.आरोपींना मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली असून गुन्हयातील संशयीत फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

ही कारवाई निरीक्षक आर.एल.पुजारी,दुय्यम निरीक्षक के.बी.बिरादार,दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर,सहा.दुय्यम निरीक्षक महेश मोहिते,जवान सचिन खाडे,संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के,किरण जंगम यांनी केलेली आहे.गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक के.बी. बिरादार हे करीत आहेत.

बातमी चौकट :

या आरोपींनी संघटीत गुन्हेगारी तयार करुन बनावट ताडी व त्यासाठी लागणारे क्लोरेल हायड्रेट तयार केल्याचे निष्पन्न झालेले आहे.अशा प्रकारची आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी बनावट ताडी व क्लोरेल हायड्रेटची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास तात्काळ देण्यात यावी,असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग, सातारा अधीक्षक चासकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *