पानशेतमधील बलात्कारातील आरोपीला फाशीची शिक्षा; डॉ. गोऱ्हेंनी थोपटली पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुखांची पाठ..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्ह्यातील पानशेत परिसरात अल्पवयीन मुलीला पैसे व खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिच्या बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.या घटनेचा पाठपुरावा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे ह्या करत होत्या.या अनुषंगाने पत्र देऊन आरोपाला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त शिक्षा होण्याची सूचना केली होती.याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क करून या केसची माहिती देखील डॉ.गो-हे या घेत असत. या घटनेतील आरोपीनं पीडित मुलीला पैसे आणि खाऊ देण्याचं आमिष दाखवून तिला पळवून नेलं होतं.यानंतर नराधमाने चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निघृण हत्या केली होती.

त्यानंतर तपास करीत असताना आरोपी संजय बबन काटकर,वय.३८ वर्षे रा.कादवे, कातकरी वस्ती,ता.वेल्हे याला अधीक्षक देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या ४८ तासात आरोपीना अटक करण्यात आले होते.हा खटला न्यायालयात गेल्यानंतर काल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.पोलिसांनी केलेली कारवाई,योग्य तपास व सादर केलेले साक्षी पुरावे न्यायालयात सिद्ध झाल्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केला आहे. तसेच न्यायाधिशांचे आभार मानले आहेत.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे व या घटनेत आरोपीला अटक करून फाशीच्या शिक्षा होण्यासाठी आणि मुलीला न्याय देण्यासाठी काम करणारी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी,सरकारी अभियोक्ता विलास पठारे,तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे गोऱ्हे यांनी अभिनंदन व आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *